Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

शेगाव : ‘गणराया पुरस्कार २०२५’ आणि ‘सिद्धिविनायक पुरस्कार २०२५’ ची नियमावली आज जाहिर होणार. *पत्रकार परिषद युवा क्रांती न्युज वर लाईव्ह पहा*



युवा क्रांती वृत्त सेवा
शेगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार संदरभातील संपूर्ण माहिती व अटी-शर्ती जाहीर करण्यासाठी पुरस्कार आयोजन समितीची पत्रकार परिषद  विश्रामगृह, शेगाव येथे 13 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. पत्रकार परिषद युवा क्रांती न्युज वर थेट प्रक्षेपण (लाईव्ह ) दाखविण्यात येणार आहे.
यावेळी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

 "माझं गाव, माझी जबाबदारी" या संकल्पनेला पुढे नेत, मोतीबाग व्यायाम प्रसारक व बहुउद्देशीय संस्था शेगाव, नागरी हक्क संरक्षण समिती, गो ग्रीन फाउंडेशन, युवा क्रांती संघटना आणि पतंजली योग समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सवात दोन भव्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. पुरस्कार आयोजन करण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

गणराया पुरस्कार २०२५ अंतर्गत फिरती ढाल व ५१ हजार रुपयांची रोख रक्कम तर सिद्धिविनायक पुरस्कार २०२५ अंतर्गत फिरता चषक व ५ हजार रुपये रोख  देण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजक किरणबापू देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पुरस्काराबाबत नवी नियमावली काय असणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.