श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :
गाडी क्रमांक 02101 विशेष दिनांक २२.०८.२०२५ ते ०५.०९.२०२५ पर्यंत दर शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे १३.४० वाजता पोहचेल. (एकूण ३ सेवा)
गाडी क्रमांक 02102 विशेष दिनांक २२.०८.२०२५ ते ०५.०९.२०२५ पर्यंत दर शुक्रवार रोजी नागपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे ०५.०० वाजता पोहचेल. (एकूण ३ सेवा)
थांबे :
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा.
संरचना :
एक वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ द्वितीय आसन व्यवस्थासह व सामान गार्ड ब्रेक व्हॅन.
अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल. या विशेष गाड्यांचे थांबे व वेळांचा तपशील पाहण्यासाठी कृपया [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
Social Plugin