शेगाव : शहरात आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, खामगाव रोडवरील काशेलानी पेट्रोल पंपाजवळील विद्युत खांब व तारेवर वीज कोसळण्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना घडली तेव्हा परिसरात जोरदार वीजांचा कडकडाट सुरू होता. विजेचा हा प्रहार इतका तीव्र होता की आजूबाजूच्या परिसरात काही वेळासाठी भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व तात्काळ विजेचा पुरवठा खंडित करून दुरुस्तीचे काम सुरू केले. अशा घटनांमुळे नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Social Plugin