Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

"धर्मांतरित आदिवासींना सवलती बंद कराव्यात" - आमदार डॉ. संजय कुटे यांची विधानसभेत ठाम मागणी



मुंबई (युवा क्रांती वृत्त सेवा) : राज्यात वाढत्या धर्मांतराच्या घटनांमुळे आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. *आ. डॉ. संजय कुटे* यांनी आज विधानसभेत हा विषय अतिशय तीव्रपणे मांडत, धर्मांतर केलेल्या व्यक्तींना आदिवासी म्हणून मिळणाऱ्या शासकीय सवलती त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी केली.

ते म्हणाले की, "ही फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक फसवणूक आहे. भिल, पावरा आदी समाजातील लोक विविध आमिषांमुळे धर्मांतर करत आहेत. धर्म, श्रद्धा बदलल्या जातात, पण सवलती मात्र आदिवासी म्हणून घेतल्या जातात, ही दुटप्पी भूमिका मूळ आदिवासी समाजावर अन्याय करते."

• मुख्य मागण्या :
- धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींच्या सवलती थांबवाव्यात.
- सरकारने समिती नेमून या प्रकरणांची चौकशी करावी.
- कठोर धोरण आणि कायदेशीर तरतुदी करून अशा प्रकरणांना आळा घालावा.

• सामाजिक न्यायासाठी लढा :
"खरे आदिवासी वंचित राहतात आणि धर्मांतरित लोक मात्र त्यांचे अधिकार बिनधास्तपणे घेतात, हे थांबले पाहिजे," असे स्पष्ट मत त्यांनी सभागृहात व्यक्त केले.
या विषयावर सरकारने तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी जनतेचीही अपेक्षा आहे.