Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज आश्रमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न...

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : संतनगरी शेगाव येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रमचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंतीच्या अर्थात ग्राम जयंतीच्या मुहूर्तावर विद्यीवत कलश स्थापना करून ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक ध्यानाच्या पाठाने आश्रमाची सुरुवात झाली, तथा गुरूवार दि.१ मे रोजी सकाळी ११ वाजता आश्रमाचे उदघाटन संपन्न झाले, यावेळी उदघाटक म्हणून जागृती आश्रमाचे महंत पु. ह.भ.प. शंकरजी महाराज, अगस्ती आश्रम रामटेक येथील मठाधिपती स्वामी श्रीराम ग्यानीजीदास महात्यागीजी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीशेत्र गुरुकुंज आश्रमचे संचालक बोर्डाच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिस्तबद्ध पद्धतीने आश्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 


यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेगाव तालुका संघचालक श्रीराम पुंडे, सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज दादा कायंदे यांचे पिताश्री माजी आमदार तोतारामजी कायंदे, विदर्भ वंजारी समाजाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी वाघ साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर महाराज मिरगे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा.डाॅ. ताराचंदजी कंठाळे सर, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य  रविंद्र दादा मुंडगावकर, केंद्रीय प्रचार विभाग समितीचे सदस्य अँड. वंदनजी कोहाडे, पंढरपूर वारीतील राष्ट्रसंत चरण पादुका पुजारी एकनाथ महाराज गावञे वरील मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न सोहळा संपन्न झाला.

सर्व प्रथम आश्रम पूजन सामुदायिक प्रार्थना मंदिर व अधिष्ठान पूजन करून आश्रमाचे नव्याने झालेल्या वास्तूची पाहणी मान्यवरांनी केली यामध्ये नियोजित गौरक्षण परिसर, वाहन तळ, नोंदणी कार्यालय, स्वागत कक्ष, सभागृह ,विद्यार्थी निवास या विभागाची पाहणी करून दीपप्रज्वलन करून "गुरुदेव हमारा प्यारा" या संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुशील महाराज वणवे यांनी केले व आश्रम निर्माण करण्यामागील भूमिका मांडली उदघाटन भाषणात श्रीराम ग्यानीदासजी स्वामी व शंकरजी महाराज यांनी आश्रम निर्माण करणे काळाची गरज असल्याचे आपल्या भाषणात मांडले, अध्यक्ष भाषणांमध्ये 


सौ. पुष्पाताई बोंडे यांनी आश्रम निर्माण कार्याला व कार्यकर्त्यांना शुभेच्छा व अभिनंदन केले, "संतनगरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम शेगांवच्या माध्यमातून सेवा मंडळाचे कार्य मोठे करण्यात आपली मोठी भूमिका निभावेल तथा गुरुदेव प्रचारकाला शेगावात राहण्याची व्यवस्था आश्रमात उपलब्ध होईल तसेच राष्ट्रसंताचे संपूर्ण महाराष्ट्रात तथा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आश्रम आहेतच परंतु नवीन युगात आणि तेही संत गजानन नगरीत हा आश्रम निर्माण झाला आहे हे सदैव स्मरणात राहील" असे उद्गार आपल्या भाषणात अध्यक्ष सौ पुष्पाताई बोंडे यांनी केले. 


या उद्घाटन सोहळ्याकरिता अकोला जिल्हा महिला सेवाधिकारी सौ संगीताताई गावंडे, अकोला शहर महिला सेवाधिकारी सौ नुतनताई कोहाडे, सौ. पद्मावती ताई टिकार, चंद्रपूर जिल्हा महिला सेवाधिकारी सौ. चंद्रकलाताई मत्ते, अमरावती जिल्हा महिला सेवाधिकारी सौ. रेखाताई पिंपराळे महिला विभागातून  उपस्थित होत्या. सूत्रसंचलन केंद्रीय प्रचार विभागाचे सदस्य कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सेवाधिकारी गणेशराव जवंजाळ, प्रा.डाॅ ह.भ.प. परायण हरिदासजी आखरे महाराज, गजाननजी ढोके सर,  मनोहर वावरे,  महेंद्र ठोंबे, मनोहर पाचपोर, शेगाव शहर सेवाधिकारी वसंतराव बोराडे, सुधाकरराव जाधव, आशिष चव्हाण, विठ्ठल आखुड, दिनेश  शेगोकार, रामेश्वरजी पाटील, वसुदेवजी पाटील, अमोल लांजुळकर, राजूभाऊ जंवजाळ, मनोज लांजुळकर, किशोर महाराज जोशी, रूपक वणवे, सागर कळमकार, गौरव दाभाडे, कृष्णा वणवे, शांतारामजी घुगे, संजय वावरे, अभी जवंजाळ तथा बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले आभार प्रदर्शन अँड वंदन कोहाडे यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.