Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

शेगावच्या श्रीराम पुंडे यांचे अनुभव कथन पुण्यात गाजले!

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शेगावचा गौरव!

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा: पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिरात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प. पू. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत शेगावचे सुपुत्र श्रीराम पुंडे यांनी आपल्या कार्य अनुभवांचे प्रभावी कथन सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात 'दर्शन योगेश्वराचे' या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य दादा खडीवाले यांच्या जीवनचरित्रावर आधारित ग्रंथाच्या प्रकाशनाने झाली. प. पू. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झालेल्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी समाजातील सेवा कार्य, स्वयंसेवकांची भूमिका व संघाचे सामाजिक योगदान या विषयांवर सखोल विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी, श्रीराम पुंडे यांनी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना आपला काव्यसंग्रह ‘भजनामृत’ भेट दिला. यावेळी सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण शांताराम मुजुमदार हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता भक्तिभावाने 'पसायदान' गात करण्यात आली. या कार्यक्रमात शेगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा सन्मानाने गाजले आहे.