Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ला पोलीस निरीक्षक पदी सुनील अंबुलकर यांची नियुक्ती


बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) :
जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मध्ये एक महत्त्वाची बदल करण्यात आली आहे. सुनील अंबुलकर यांची LCB पोलीस निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. काल ३० जून रात्री उशिरा ही नियुक्ती जाहीर झाली असून पोलीस विभागात ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे.


सुनील अंबुलकर हे अनुभवी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदावर काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात शेगाव शहरातील अनेक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात आणि तपास प्रक्रियेला गती देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळेच त्यांच्या नव्या नियुक्तीबाबत विभागात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. अशा विभागात अंबुलकर यांची नियुक्ती झाल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासास अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ही नेमणूक निर्णायक ठरेल, असा विश्वास पोलीस विभागात व्यक्त होत आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबुलकर लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नव्या भूमिकेसाठी पोलीस दलातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.