स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात नेत्यांचे मार्गदर्शन; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..!
वरवट बकाल, संग्रामपूर (आकाश बोरासे) : संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटीची एक महत्त्वपूर्ण व नियोजनात्मक बैठक वरवट बकाल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद विधानसभा पक्ष नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर होत्या. कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा कॉंग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष श्र्लोकानंद डांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रकाश देशमुख, संतोष भाऊ राजनकार, संजय भाऊ ढगे, पठाण सर, शाम डाबरे यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीचे प्रस्ताविक तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश टाकळकर यांनी केले. त्यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची एकजूट व संघटन यावर भर देत सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन काम करण्याचे आवाहन केले. पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रचार, जनसंपर्क, व सोशल मीडिया वापरावर भर देण्याचे ठरवण्यात आले.
बैठकीला अच्छे खा पठाण, प्रमोद गढे, बळीराम धुळे, मुन्ना ठेकेदार, संजय पवार, गजानन ढगे, जगन्नाथ विश्वकर्मा, अजय अग्रवाल, प्रकाश साबे, अमोल घोडेस्वार, अशोक भिवटे, योगेश बाजोड, गणेश टापरे, नक्कलसिंग भाटिया, जिवन लोणकर, शंकरनाथ विश्वकर्मा, शिवहरी वाभे, शेख मोहिद्दीन, वामन बोरसे, मनोहर राऊत, संदीप डाखोडे, माणीकराव राऊत, रामसिंग सोळंके, कैलास आकोटकर, राहुल साबे, अक्षय येनकर, संतोष धुदळे, महादेव बोडखे, सोमेश कोकाटे, विश्वासराव पाटील, आकाश बोरसे, नारायण बोरवाल, साजिद पठाण, भास्कर धर्मे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल देशमुख यांनी करत उपस्थितांचे आभार मानले. कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आयोजित ही बैठक यशस्वी ठरली असून आगामी निवडणुकांमध्ये संग्रामपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची ताकद अधिक वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (युवा क्रांती वृत्तसेवा)
Social Plugin