Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत कार्यशाळा उत्साहात 166 मुला मुलींचा सहभाग

खामगाव (प्रतिनिधी) : निपुण महाराष्ट्र अभियानांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 22/4/2025 रोजी सकाळी10 ते 5 या वेळेमध्ये जिल्हा परिषद कन्या हायस्कूल खामगाव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत 166 मुला मुलींनीसहभाग घेऊन प्रक्रिया समजून घेतली
5 मार्च 2025  रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित
करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीटीएड झालेल्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  दिनांक 22/4/2025 रोजी सकाळी10 ते 5 या वेळेमध्ये जिल्हा परिषद कन्या हायस्कूल खामगाव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी  बुलडाणा DIET चे  प्राचार्य  भटकर , व डाॕ.  अधिव्याख्याता  समाधान डुकरे , बुलडाणा ,  जी डी गायकवाड गटशिक्षणाधिकारी  गोसावी सर,  राऊत सर तसेच विषयसाधनव्यक्ती सुनिता गवई , विठ्ठल पाथ्रीकर , विनोद भुसांडे, राजेश शर्मा, व 166  मुला मुलींनी या प्रशिक्षणा शिबिराचा लाभ घेतला.