संग्रामपूर जि बुलढाणा (आकाश बोरसे) : तालुक्यातील चांगेफळ खुर्द येथील सदन कास्तकार नयन महादेव इंगळे यांच्या शेतात गोदरेज कंपनीने खरीप पेरणीपुर्व कपाशीचा प्रात्यक्षिक प्लॉट लागवड केलेला आहे. कपाशी पिकातील गोदरेज कंपनीचे सर्वोत्कृष्ट तणनाशक हिटवीड म्यॅक्स च्या प्रात्यक्षिक प्लॉट चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तणनाशकाचा कपाशी पिकावर कश्या पद्धतीने वापर करावा व किती प्रमाणात करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या ठिकाणी तणनाशक फवारणी केलेले कपाशी पीक व फवारणी न केलेले कपाशी पीक यातील फरक शेतकरी बांधवाना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आला. तणनाशकाचा योग्य वेळी योग्य वापर केल्यास तणनियंत्रण चा खर्च कसा कमी होतो, त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिक प्लॉट पाहण्यासाठी अनेक गावातून शेतकरी आले होते.. या कार्यक्रमाला गोदरेज कंपनीचे बुलढाणा टेरिटरी व्यवस्थापक नागरे, अनंता मानकर, नयन इंगळे, अरुण वानखडे यांच्या सह निवाना, चांगेफळ बु, चांगेफळ खुर्द, अकोली, रुधाना, वाकणा, निरोड, बोडखा, धामणगाव, सावळा, मारोड व पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Social Plugin