जळगाव जा.जि बुलढाणा : 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जळगाव जामोद पंचायत समितीचा विभागात पहिला क्रमांक आला असून आमदार डॉ संजय कुटे यांनी अधिकारी व कर्मचारी वृंदांचा सत्कार करुन कौतुकाची थाप दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या “100 दिवस कृती आराखडा” या उपक्रमांतर्गत, अमरावती विभागात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या जळगाव जामोद पंचायत समितीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमात 100% उद्दिष्टपूर्ती करत जळगाव जामोद पंचायत समितीने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हा यशाचा टप्पा गाठण्यात पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, व कार्यरत यंत्रणांनी घेतलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.
या यशाचे श्रेय जाते —
• प्रशासनाच्या प्रभावी नियोजनाला
• अधिकाऱ्यांच्या समर्पित कार्यशैलीला
• कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण व अथक परिश्रमांना
या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जळगाव जामोद पंचायत समितीच्या संपूर्ण टीमचे आ डा संजय कुटे यांनी अभिनंदन केले.
Social Plugin