संग्रामपूर जि. बुलढाणा (आकाश बोरसे) : तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या येत्या ३१ मे रोजी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत संमिश्र पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी परिवर्तन पॅनल आणि शेतकरी सहकार विकास आघाडी असे दोन प्रतिस्पर्धी पॅनल तयार केले असले तरी, सदर निवडणूकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे.
निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ८ हजार १७२ आहे. २० मे रोजी चिन्ह वाटप झाले असून भाजप व सहकरी पक्षाचे शेतकरी परिवर्तन पॅनलला छत्री तर काँग्रेस व सहाकरी पक्षाचे शेतकरी सहकार विकास आघाडीला हेलीकॉप्टर निशानी मिळाली असून यात दोन्ही पॅनलचे प्रत्येकी १५ तर ३ अपक्ष उमेदवार असे ३३ उमेदवार रिंगणात आहे. संग्रामपूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत एकूण ६ मतदारसंघ असून त्यातून १५ संचालक निवडले जाणार आहेत. यात सहकारी संस्था मतदारसंघातून ५ संचालक निवडून येणार असून शेतकरी परिवर्तन पॅनलकडून माजी बाजार समिती सभापती गजानन दाणे, गणेश भुते, नंदकिशोर चिकटे, माधव फाळके, पुरुषोत्तम मुरुख हे ५ उमेदवार तर शेतकरी सहकार विकास आघाडीकडून सुभाष चांदुरकर, विजय चरखे, विजय खराटे, गणेश खोंड, संजय वाकडे हे ५ उमेदवार असे एकूण १० उमेदवार मैदानात आहे. या सहकारी मतदारसंघात फक्त २७ मतदार असल्याने निवडणूक चुरशीची बनली असून क्रॉस व्होटिंग रोखण्याचा मोठा आवाहनही पॅनलचे नेतेमंडळींसमोर असणार आहे.
वैयक्तिक सर्वसाधारण मतदारसंघातूनही ५ संचालक निवडून येणार असून यात परिवर्तन पॅनलचे माधव आगरकर, राजेंद्र देशमुख, शिवहरी खोंड, रमेश मारोडे, उद्धव व्यवहारे तर विकास आघाडीचे अरूण बोरोकार, यशवंत दाणे, विलास मोरखडे, संजय राहणे, राजेंद्र उगळकार व अपक्ष महणून जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी आणि उद्धव बकाल असे एकूण १२ उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात आहे.
महिला राखीव मतदारसंघातून २ महिला खरीदी विक्रीचे संचालक होणार आहेत. यात परिवर्तन पॅनलचे वैशाली अनूप अवचार, ज्योतीबाई संजय लव्हाळे तर विकास आघाडीचे अंतकला अरूण गोतमारे, साधना दिलीप पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून १ संचालक निवडून येणार असून दोनही पॅनलकडून वरवट बकाल येथील रहिवाशी असलेले निरंजन इंगळे हे परिवर्तन पॅनलचे तर राजू राठोड हे विकास आघाडीचे उमेदवार संचालक होण्यासाठी आपली राजकीय ताकत लावणार आहेत. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून १ संचालक होणार असून परिवर्तन पॅनलचे प्रकाश उभे, विकास आघाडीतर्फे पुंडलीक भिवटे तर अपक्ष म्हणून शुभम इंगळे उभे आहेत. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघाच्या १ संचालक पदासाठी दोन उमेदवार असून परिवर्तन पॅनलचे प्रल्हाद वरणकार विरुद्ध विकास आघाडीचे संजय मारोडे यांच्यात थेट लढत होणार आहे. महायुती की महाविकास आघाडी? कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले असून १ जून रोजी मतमोजणीनंतर निवडणूक अधिकारी कृपलाणी निकाल जाहीर करणार आहेत.
Social Plugin