शेगाव जि बुलढाणा : शहरातील अंजुमन उर्दू हायस्कूल जुनियर कॉलेज मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
इको क्लब मिशन लाइफ अंतर्गत विद्यालयात वन महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत विद्यालयामध्ये इको क्लब प्रमुख आणि विद्यार्थ्यांचे हस्ते विद्यालयाच्या परिसरात तुळशी, पानफुटी या रोपट्यांचे रोपण करण्यात आले
तसेच "क्यू आर कोड्स फोर फ्लोरा या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरामधील प्रत्येक वनस्पतींच्या प्रजातींबद्दल सर्वसमावेशक माहिती असलेले क्यू आर कोड्स तयार करून लावण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य इमरान खान यांनी शाश्वत जीवनशैलीसाठी योगदान देणारे पर्यावरणपूरक वर्तन आणि दृष्टिकोन निर्माण करण्याचे आवाहन केले याप्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ असलेले सचिव माननीय मोहम्मद रफीक मोहम्मद
सिद्दीक तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अतिक मेमन यांनी इको क्लबच्या सदस्यांना आणि विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केल्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्यात. कार्यक्रमात विद्यालयाचे पर्यवेक्षक मो. तनवीर इको क्लबचे प्रमुख, अमानुद्दीन, इकामोद्दीन अब्दुल बासित प्राथमिकचे मुख्याध्यापक फिरोज खान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin