शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :-- विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करणे महत्त्वाचे असून त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप अतिशय मोलाची ठरते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना भविष्याची प्रेरणा मिळते त्याकरिता मराठा पाटील समिती च्या वतीने करण्यात आलेला गुण गौरव सोहळा हा अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शहर ठाणेदार नितीन पाटील यांनी काढले.
शेगांव शहरात मराठा पाटील युवक समिती कडून दहावी, बारावी मध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
दिनांक १५ जून रोजी स्थानिक माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या संतनिवृत्ती सभागृह हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील युवक समिती चे संस्थापक अध्यक्ष गजाननदादा ढगे होते तर उद्घाटक म्हणून मराठा पाटील समाजाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरदादा पाटील होते. मराठा पाटील युवक समिती जिल्हा अध्यक्ष सुनील कुईटे,शेगांव शहर ठाणेदार नितीन पाटील ,ग्रामीण पो स्टे चे ठाणेदार प्रवीण लिंगाडे , सां बा विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर, व्हॉईस ऑफ मिडिया चे तालुका अध्यक्ष नानाराव पाटील, समितीचे शहराध्यक्ष महेश पहूरकार,उपाध्यक्ष सागर जंवजाळ तालुका अध्यक्ष ऋषिकेश हिंगणे तालुका उपाध्यक्ष अनिनाश कोकाटे , मोहन घुईकर ,प्रतीक मिरगे, शिक्षक वृंद नंदलाल उन्हाळे, अमोल कराळे , परीक्षित झाडोकर,रामेश्वर लोखंडे, फाळके , मयूर ठाकरे, निखिल म्हैसने , विठ्ठल पिसे , गणेश गिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात ज्यांची नियुक्ती झाली त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
© मान्यवरांनी नियोजनाचे केले कौतुक...
एका समाजाने सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे प्रेरणादायी असल्याने या कार्यक्रमाचे नियोजनासाठी मान्यवरांनी आयोजकांचे ही कौतुक केले. इयत्ता दहावी आणि बारावीतील 200 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील नोकरीवर लागलेल्या व्यक्तींचा शाल श्रीफळ विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला ,तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आणि पत्रकार यांचा यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नंदलाल उन्हाळे यांनी दत्तक घेतलेला मुलगा शाळेतून प्रथम आल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून शिक्षकांचा विशेष सत्कार घेण्या आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठा पाटील युवक समिती चे जिल्हा सदस्य दत्ता वडतकार, साहिल ढगे ,राहुल हिंगणे ,हर्षल पुंडकर ,ध्यानेश्वर उन्हाळे ,गजानन जंजाळ ,प्रज्वल ढगे ,सच्चिदानंद निळे,प्रतिक गीते, आयुष पहुरकार , ऋषी गीते,अमोल जवंजाळ,यांच्या सह मराठा पाटील युवक समितीचे शहर तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ऋषिकेश हिंगणे, सूत्रसंचल विठ्ठल अवताडे यांनी केले तर कार्यक्रमासाठी भरभरून मदत करणाऱ्यांचे आभार महेश पहूरकार यांनी मानले.
© मराठा पाटील समाज हा सर्व समाजाला घेऊन चालतो -- गजानन ढगे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून आम्ही जे उपक्रम राबवतो ते उपक्रम सर्वांसाठी असतात युवक समितीच्या वतीने सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला हे त्याचे उत्तम उदाहरण असून मराठा पाटील समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा असल्याचे मत मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी यावेळी व्यक्त केले.
Social Plugin