जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर जळगाव जामोद तालुक्यातील दादूलगाव येथील संजय मनोहरराव फलके या तरुणाने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी मोठं यश संपादन करत महाट्रान्स्को (MSETCL) मध्ये टेक्निशियन असिस्टंट या पदावर यशस्वीपणे नियुक्ती मिळवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजयजी कुटे व सौ. अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते संजयचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी गजानन सरोदे, गणेश गोतमारे, पांडुरंग बावस्कर, ऋषिकेश कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजयच्या या यशामुळे केवळ त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव आणि तालुका अभिमानाने भरून निघाला आहे. ग्रामीण भागातूनही योग्य दिशा, मार्गदर्शन व परिश्रमांमुळे शासकीय सेवेत भरारी घेता येते, याचा आदर्श संजय फलके यांनी उभा केला आहे. यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
Social Plugin