Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री संचालक मंडळाची निवडणूक 31मे रोजी

संग्रामपूर जि. बुलढाणा (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या 15 संचालक मंडळाच्या निवडणुकीचा  कार्यक्रम 22 एप्रिल पासून घोषित झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे.तर येत्या 31 मे रोजी निवडणूक होणार आहे.
 निवडणुक कार्यक्रमानुसार सहकारी संस्था मतदार संघ 5, वैयक्तिक सर्वसाधारण मतदार संघ 5, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ 1, महिला राखीव मतदार संघ 2, इतर मागासवर्ग राखीव मतदार संघ विमुक्त जाती/ भटक्या विमाप्र सदस्य 1-1 अशा एकूण 15 संचालकांचे जागेसाठी निवडणूक होणार आहे.
22 एप्रिल पासून ते 28 एप्रिल पर्यंत सकाळी निवडणूक निर्णय अधिकार यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र मिळतील व स्वीकारले जातील. 2 ते 19 मे पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून 20 मे रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. 31 मे रोजी मतदान होवून 1 जून रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणी होणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मंडळी सक्रिय झाली असून  आपापल्या पॅनलसाठी उमेदवाराची चाचपणी करत आहेत.