Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

आता बहुमताने नगराध्यक्षांना पदावरून हटवता येणार●राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ● स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर होण्याची शक्यता !

मुंबई (विजय यादव ) : आता बहुमत असेल तर नगरसेवक नगराध्यक्षांना अध्यक्ष पदावरून हटवू शकतील,असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.यासंदर्भात लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून राज्यातील अस्तित्वात असलेल्या १०५ नगरपरिषदा, नगरपंचायतींना अधिकार दिले आहेत.बहुमताच्या सह्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवता येईल,असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने नगरसेवकांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवता येईल. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांना १० दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल.
सरकारने अधिनियमात सुधारणा केल्याने अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्या वर्षी दिवाळीनंतर होण्याचे संकेत मिळत आहेत.
याअगोदर नगराध्यक्षांना पदावरून बाजूला सारण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० टक्के नगरसेवकांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यावर राज्य सरकारच्या स्तरावर याबाबतचा निर्णय होत असे.पूर्वीच्या अधिनियमात सुधारणा करून आता सरकारने आपले अधिकार सध्या अस्तित्वात असलेल्या १०५ नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीच्या लोकनियुक्त नगरसेवकांना दिले आहेत. या १०५ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत येत्या दोन वर्षात संपत आहे.
●राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमात सुधारणा करून नगराध्यक्षांनी पदावरून हटविण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. सभागृहाला मान्य निर्णय न घेता नगराध्यक्ष मनमानी करत असेल तर त्यावर अंकुश असणे गरजेचे आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतो
- शरदसेठ अग्रवाल 
- माजी नगराध्यक्ष,शेगाव 
●नगराध्यक्ष पदावर अंकुश असणे गरजेचे आहे,पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एका पक्षाचा आणि बहुमताचे नगरसेवक दुसर्‍या पक्षाचे असतील तेव्हा राजकारण म्हणून विनाकारण अविश्वास आणण्यात येवू कायद्याचा दुरूपयोग होवू नये.
-शैलेंद्रदादा पाटील 
माजी नगराध्यक्ष शेगाव