शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत काम बंद आंदोलन तूर्त स्थगित
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कनाटे यांची जि प च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
थकीत रक्कम पूर्ण देण्याची जि प कडे केली मागणी
शेगाव (प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काम आंदोलन काम बंद आंदोलन केले,मात्र गटविकास अधिकारी कनाटे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रा प कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम पूर्ण देण्याची मागणी केली,त्यामुळे काम बंद आंदोलन तूर्त मागे घेतल्याची माहीती म रा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे जिल्हाध्यक्ष यशवंत इंगळे यांनी दिली.
किमान वेतनातील 19 महिन्याची येरियसची रक्कम थकीत असल्याने म रा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा शेगाव तालुक्याचे वतीने गटविकास अधिकारी कनाटे यांना अगोदर निवेदन देण्यात आले.किमान वेतनातील येरियस ची 19 महिन्याची थकीत रक्कम तात्काळ देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.मंगळवारी दिवसभर शेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले.दुपारी गटविकास अधिकारी कनाटे यांनी दखल घेवून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.व थकीत रक्कम पूर्ण देण्याची मागणी केली.
ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष यशवंत इंगळे, शेगाव तालुका अध्यक्ष डिगांबर जवंजाळ, शेगाव तालुका उपाध्यक्ष संतोष उबाळे, तालुका सचिव जानराव दाभाडे, खेमराज घाटे, ज्ञानेश्वर पाटोळे, अजय भांबेरे, पांडुरंग नावकर, मोहन चिंचोलकर, रणजीत बोरकर ,दरबार डाबेराव,डी भोजने, गजानन निलजे, कैलास वानखडे,देविदास देवरे,संपत मिश्री, उद्धव दळी आदीसह शेगाव तालुक्यातीलग्रा प कर्मचारी सहभागी झाले,दरम्यान शेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामा पाटील थारकर यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनला पाठिंबा दिला आहे.
Social Plugin