वडवणी दौऱ्यात असताना शिवाजीराव..(अनिलराव) यांना बोलवा..अशा सुचना आपल्या कार्यकर्त्यांना देऊन त्यांच्या कार्यकाळात गाव तेथील दौऱ्यात मी सहभागी असायचो. कोणी विरोध केला तरी त्याला आपलंसं करणारं व्यक्तीमत्व म्हणजे माजी आमदार आर.टी.देशमुख जीजा.. त्यांच्या कार्यकाळात वडवणी तालुक्यातील अनेक विकासात्मक घडामोडींचा मी साक्षीदार राहीलो. एक अनुभव सांगायचा झाला तर (मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी आपल्या देवडी या गावी जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. तो डांबरीकरण करणे गरजेचे असल्याचे माझ्या माध्यमातून आर.टी.देशमुख जीजा यांना सांगितले. खरंतर अनेक पुढारी बघू.? करू.? पाहू.? बजेट नाही.? यासारखे अनेक कारणं सांगतात. मात्र आर.टी.जिजा यांनी सरांनी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. आपल्या मतदारसंघातील राज्य स्तरावर एका मोठ्या संघटनेचे नेतृत्व करणारे एस.एम.देशमुख यांच्या गावाकडचा रस्ता मंजूर कधी होईल..बजेट कधी पडेल.? याच वाट न बघता मंजूर होईल तेव्हा होईल.? बजेट पडेल तेव्हा पडेल.? जिजांनी तो तीन ते चार किलोमीटर चा डांबरीकरण रस्ता स्वखर्चाने केला. जिजांनी जीव लावलेली माणसं त्यांच्या पासुन कधीच दुर गेली नाहीत. मग ती पक्षाची असोत की नसोत.. मी तर सुरुवातीलाच सांगितले माझ्याकडे एक ना अनेक उदाहरणे आहेत. मागील काळात ते वर्षभराच्या ही पुढे उपचारासाठी इतर राज्यात होते. तेव्हा सुद्धा अनेकजण आत्मीयतेने विचारपूस करून जीजा लवकर बरे व्हा. असे सोशल मीडियावर मॅसेज करायचे. तंदुरुस्त असणारे जीजा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले. गाव भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत ते अख्ख्या जिल्ह्यात प्रवास करत राहिले.. मध्यांतरातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सहभागी होऊन पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पडली. अशा या चौकोनी चिरा असलेल्या व्यक्तीमत्वावर काळाने घाला घातला. लातूर जिल्ह्यातील बेलकुंड (ता. औसा) परिसरात आज हा भीषण अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर.टी. देशमुख (जिजा) यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- अनिल वाघमारे
संपादक डोंगरचा राजा,
वडवणी जि बिड
Social Plugin