Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

●मराठा जोडो अभियान...! ●मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा रविवारी शेगाव संतनगरीत युवा क्रांती न्युज कडून लाईव्ह प्रेक्षपण होणार

शेगाव (जि बुलढाणा ) : मराठा जोडो अभियाना अंतर्गत मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ  रथयात्रा रविवारी सकाळी 9 वा  अकोला मार्गे जवळा बु येथून शेगाव संतनगरीत दाखल होणार आहे.या रथयात्रेचे युवा क्रांती न्युज कडून लाईव्ह प्रेक्षपण दाखविण्यात येणार असल्याची माहिती युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक विजय यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
युवा क्रांती न्युज कडून लाईव्ह प्रेक्षपण होणार
मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असून, गेल्या ३५ वर्षापासून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी परिवर्तनवादी, प्रगतशिल आणि सकारात्मक कार्य करीत आहे. समाजाच्या हितासाठी विविध ३३ कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत. आज आपल्या समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक आणि राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता घोक्यात आली आहे. धार्मिक सलोखा दुभंगला आहे आणि समाजाची मजबूत विण विस्कटत चालली आहे. समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रोढ महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंध करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा २०२५ अंतर्गत बहुजन मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात येत आहे.
 या रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंती १८ मार्च २०२५ वेरूळ, छत्रपती संभाजीनगर  येथून झाला आहे.तर समारोप महाराष्ट्र दिन / कामगार दिन १ मे २०२५ लाल महाल, पुणे येथे होणार आहे. या ४५ दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधण्यात येईल. कोकणातील तळ भाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे.
●रथयात्रेतील महत्त्वाचे विषय आणि उद्दिष्टे..
संविधान, कायदा आणि हक्क याबद्दल जनजागृती नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये समजावून सांगणे.
सामाजिक एकता आणि एकात्मता समाजात सलोखा आणि ऐक्य राखण्याचे महत्व, जातीय तेढ आणि सामाजिक दुभंग यावर प्रवोधन,
सर्व धर्म, जात आणि पंथ यांना जोडणारे विचार मांडून एकतेचा संदेश.
धार्मिक आणि राजकीय उन्माद टाळण्यासाठी संवाद व शहाणपणाचे विचार समाजात द्वेष आणि मतभेद नको, तर परस्पर सहकार्याची भावना जोपासणे.
शेती आणि अर्थव्यवस्था शेतकरी समस्या, त्यावरील उपाययोजना आणि बदलत्या अर्थव्यवस्थेतील नवीन संधी.
रोजगार आणि शिक्षण जागतिकीकरणाच्या युगातील नव्या संधी, युवकांसाठी रोजगारविषयक मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व.
युवकांना विधायक मार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन व्यसनाधीनता, बेटोजगारी, दिशाभूल करणाऱ्या प्रवृतींना थांबवण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा.
महिला सक्षमीकरण महिलांसाठी असलेल्या शेक्षणिक, आर्थिक आणि समाजिक संधीवाबत चर्चा, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता यावर विशेष भर
शासकीय योजना आणि लाभ शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व त्याचा समाजातील प्रत्येक घटकाने कसा लाभ घ्यावा, याबाबत मार्गदर्शन.
गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी जनजागृती समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने कायद्याचे पालन करणे, सुशासनासाठी सजग नागरिक होणे.
सामाजिक विण पुन्हा मजबूत करण्यासाठी कुटुंबसंस्था, संस्कार आणि परंपरांचा सन्मान बहुजन मराठ्यांच्या उज्वल परंपरेचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी दृढ करणे.
ही यात्रा संपूर्ण समाजासाठी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने यात सक्रिय सहभाग घ्यावा, या ऐतिहासिक आंदोलनाचा भाग व्हावे आणि सामाजिक बंधुभाव वाढविण्यासाठी योगदान द्यावे. एकीचे बळ हेच समाजाच्या उन्नतीचे पायाभूत तत्व आहे. चला, जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून नव्या परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करूया ! चला, नव्या परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करूया !

●रविवार दि. २० एप्रिल २०२५ आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्यातील कालावधी व मार्गक्रमण...
शेगांव दि २० एप्रिल रोजी आगमन होत आहे सकाळी ९ वा जवळा फाटा, १:२० वा मराठा पाटील सेवाभावी संस्था, ९:३० आनंद विसावा शेगांव येथे आगमन,
९:४५ मोठा महादेव मंदिर, १० संत गजानन महाराज मंदिर परिसर, १०:३० संत गाडगे बाबा चौक, १०:४५ गांधी चौक, १०:५० छत्रपती शिवराय चौक, १२ वा अग्रसेन चौक, ११:१० रेल्वे स्टेशन जवळ शासकीय विश्राम भवन, ११:२० जगदंबा चौक, डॉ. पंजाबराव देशमुख चौक वाटिका ११,३० जिजामाता चौक, १२ वा माऊली इंजीनियरिंग कॉलेज येथे दुपारचे भोजन, दु १ वा खामगांव कड़े प्रस्थान, खामगांव १:२० उम्राण पुल, १:३० शेगांव नाका, १:४० महात्मा फुले रुग्णालय, १:५० डॉ बाबासाहेब अबिडकर पुतळा, २ वा अर्जुन जलमंदीर, २:१० छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, २:२० अर्जुन जलमंदीर २:२५-जगदंबा चौक, २:३५ फरशी चौक, २:४० भगतसिंह चौक, २:५० टॉवर चौक तुळजाई हॉटेल, ३:२० जलंब नाका, ३:३० सुटाळा खुर्द नांदुरा कड़े प्रस्थान, नांदुरा दु ४वा विश्राम गृह नांदुरा येथे आगमन ४:२० मधुबन चौक, ४:४० गांधी चौक, ४:५० उमंग चौक, ५ वा छत्रपती शिवराय पुतळा, ५:३० नेताजी सुभाषचन्द्र बोस चौक, ५:४० मोठा हनुमान
मलकापुर कड़े प्रस्थान वडी-वडनेर-धानोरा-वाघुड मलकापुर ६:२० मलकापुर उड्डाण पुल येथे आगमन, ६:३० सावजी नगर, ६:४० तहसील चौक, ६:५० हनुमान चौक, सायं ७ वा तुलसी ज्वेलर्स मार्ग जिजाऊ लॉन छत्रपती शिवराय मंगल कार्यालय येथे आगमन
ज़ाहिर सभा व मुक्काम दि २१ एप्रिल सकाळी ८:३० छत्रपती शिवराय मंगल कार्यालय येथून प्रस्थान तहसील चौक ८:४० छत्रपती शिवराय पुतळा येथुन मुक्ताईनगरकडे प्रस्थान

तरी सर्व मराठा बहुजन समाज बांधवानी जिजाऊ स्थयात्रेत शेगांव ते मलकापुर सहकुटुंब जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा पाटील सेवाभावी संस्था, मराठा पाटील सेवा मंडळ मराठा पाटील युवक समिती देशमुख समाजोन्नती मंडळ, मराठा बहुजन समाज संघटना, जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.