Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

ओ आमदार काका,उसाचा रस घ्या ना! शेगावातील एक हृदयस्पर्शी प्रसंग

शेगाव जि बुलढाणा : शहरातील महाराजा अग्रसेन चौकात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. डॉ. संजय कुटे हे विविध लग्न समारंभांना भेटी देत असताना, कडाक्याच्या उन्हामुळे थकवा जाणवत होता. तेव्हाच एका चिमुकल्याने "ओ आमदार काका, उसाचा रस घ्या ना!" अशी निरागस हाक दिली. या बालकाच्या प्रेमळ आमंत्रणाला प्रतिसाद देत, आमदार कुटे यांनी रसवंतीवर थांबून उसाचा रस घेतला आणि त्या मुलाचे गोड कौतुक केले.
या प्रसंगावर बोलताना आ. डॉ. संजय कुटे म्हणाले, "त्या रसात फक्त गोडवा नव्हता, तर त्या मुलाच्या निरागसतेचा, प्रेमाचा आणि शुद्ध भावनेचा स्वाद होता." हा क्षण आयुष्यात थोडा थांबून गोडवा अनुभवण्याची आठवण देणारा होता.
हा प्रसंग आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या लोकसंग्रहाची आणि त्यांच्या सहजसंपर्काची साक्ष देतो. त्यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे.