शेगाव (प्रतिनिधी) :श्री हनुमान मंदिरात पार पडलेले हे धार्मिक कार्यक्रम गावाच्या अध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले. अशा सोहळ्यांमुळे गावात भक्ती, श्रध्दा आणि संस्कारांचे बीज रुजत असल्याचे भावोद्गगार आमदार डॉ संजय कुटे यांनी घुई येथे बोलतांना
तालुक्यातील घुई येथील श्री हनुमंराय मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव व कलशारोहण सोहळ्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.दरम्यान माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे यांनी कीर्तनाचा लाभ घेतला.
यावेळी हभप श्री.पंढरीनाथ महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले. त्यांनी श्रीहरीच्या भक्तीचे महत्त्व, रामभक्त हनुमानाची सेवा, निस्वार्थी प्रेम आणि समाजातील आध्यात्मिक जागृती यावर सुंदर शैलीत प्रकाश टाकला.
हभप श्री. पंढरीनाथ महाराज यांच्या रसाळ व प्रभावी हरी कीर्तनाचे श्रवण करताना भाविक तल्लीन होवून सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. त्यांच्या कीर्तनातून श्रीराम-हनुमंत भक्तीचे दर्शन झाले आणि आत्म्याला एक विलक्षण समाधान लाभल्याची भावना आ डॉ संजय कुटे यांनी व्यक्त केली.
या पवित्र वातावरणात त्यांनी गावकरी बांधवांशी संवाद देखील साधला.अडी अडचणी,समस्या जाणून घेतल्या.
Social Plugin