संग्रामपूर जि बुलढाणा (आकाश बोरसे) : तालुक्यातील सहकार महर्षी ज्येष्ठ नेते स्व.दत्तूसेठ शिरसोले यांचे नातू तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा संघटक राहुल संजय शिरसोले आणि प्रगतीशील युवा शेतकरी संजय मुरलीधर इंगळे यांनी जळगाव जा.विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार डॉ.श्री.संजय श्रीराम कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजप सरकारची कार्यप्रणाली, विकासाभिमुख दूरदृष्टी केंद्रात, राज्यात तसेच मतदारसंघात तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नामुळे व त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करण्यात आला.राहुल शिरसोले यांच्या भाजप परिवारातील प्रवेशाने पक्ष अजून मजबूत होईल.
यावेळी संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील,संग्रामपूर कृ.ऊ.बा.स चे संचालक उमेश टावरी,श्रीकांत मारोडे,ओमप्रकाश धुत पांडूरंग इंगळे जयराम इंगळे रमेश चोपडे संजय बोरसे राजेश मुंयाडे,शंभूराजे गोतमारे,
उमाकांत शिरसोले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Social Plugin