शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शेगाव रेल्वे स्थानकावर पर्यावरण जागरूकतेसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली. स्टेशन प्रबंधक, आरोग्य निरीक्षक, रेल्वे कर्मचारी यांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या रॅलीद्वारे प्लास्टिकमुक्त पर्यावरण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि स्वच्छता यासारख्या महत्वाच्या विषयांवर संदेश देण्यात आले. “स्वच्छ, हरित व निरोगी भारत” या ध्येयाचा अंगीकार करून सर्वांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, हा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून शेगाव रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानक प्रमुख आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान राहिले.
Social Plugin