भुसावळ (युवा क्रांती वृत्तसेवा) : भुसावळ विभागातील इलेक्ट्रिक लोको शेड (ईएलएस), भुसावळ द्वारा आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान पारंपरिक इलेक्ट्रिक इंजिनांच्या देखभाल व संचालनामध्ये अपूर्व कामगिरी करत एक महत्त्वाची उपलब्धी मिळवली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने इलेक्ट्रिक लोको शेड भुसावळला देशभरातील 39 पारंपरिक इलेक्ट्रिक लोको शेड्समध्ये तिसरा क्रमांक प्रदान केला आहे.
भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेडने बिघाड दर (Failure Rate per 100 Conventional Electric Locomotives per Month - FRPCPM) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 6.8 वरून कमी करत 2024-25 मध्ये 5.0 पर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे.
ही उल्लेखनीय प्रगती केवळ भुसावळ लोको शेड टीमच्या तांत्रिक कौशल्य आणि बांधिलकीचे प्रतिक नाही, तर यामुळे शेडला संपूर्ण भारतात पारंपरिक इलेक्ट्रिक इंजिन चालविणाऱ्या 39 लोको शेड्सपैकी तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा सन्मान रेल्वे बोर्डाने दिला आहे.
हा सन्मान भुसावळ विभागासाठी अभिमानाचा क्षण असून, भारतीय रेल्वेच्या विशाल लोकोमोटिव्ह नेटवर्कमध्ये कार्यक्षमतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी विभागाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. रेल्वे बोर्डाकडून मिळालेला हा गौरव केवळ तांत्रिक कौशल्याची पावती नसून, संपूर्ण विभागासाठी अभिमान आणि प्रेरणास्थान देखील आहे.
भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेडची ही कामगिरी केवळ भुसावळ विभागासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय रेल्वेसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. ही कार्यक्षमता, शिस्त आणि उत्कृष्टतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे.
Social Plugin