संग्रामपुर (आकाश बोरसे) : संग्रामपुर तालुक्यातील टूनकी येथील ग्रामपंचायत येथे जगाला शांततेचा मार्ग शिकवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सीमा राजेंद्र वानखडे व सदस्यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचे पूजन करण्यात आले. संग्रामपूर तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वानखडे त्यांच्याकडून निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या सौं स्वातीताई संदीप वाकेकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव रामविजय बुरुंगले, डॉ. संदीप वाकेकर, जळगाव जामोद तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, संतोष राजनकार, आनंद राजनकर, अशोक पालकर, वडगाव वानचे सरपंच पंकज मिसाळ, प्रमोद गळे, जळगाव जामोद शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, अभयसिंग मारोडे, सतीश टाकळकर, मोहनराव रौंदळे सर, संतोष टाकळकर, राजूभाऊ राठोड यांसह अनेकांची या कार्यक्रमांला उपस्थित होती. यासोबत संग्रामपूर तालुक्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळी, काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थित होती. (युवा क्रांती वृत्तसेवा)
Social Plugin