Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

किडनी ग्रस्त रुग्णांना फळवाटपकरून साजरा केला जयश्री शेळके यांचा वाढदिवस

किडनी ग्रस्त रुग्णांना फळवाटप करतांना शिवसैनिक

संग्रामपूर (आकाश बोरसे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या आदरणीय जयश्री ताई सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात किडनी ग्रस्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

हा उपक्रम शिवसेना व युवासेना तालुका संग्रामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार, वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद भाऊ अस्वार, तालुका संघटक राहुल मेटांगे, युवासेना विधानसभा संघटक अजय घीवे, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे, माजी सरपंच मानकर, धनंजय अवचार, तुषार थेरोकार आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना आधार मिळाला असून उपस्थित मान्यवरांनी जयश्री ताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आरोग्यदायी, दीर्घायुषी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. (युवा क्रांती वृत्तसेवा)