📍राजुर घाट ता.बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा)
भारताचे केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा
मतदार संघातील राजुर घाट येथे श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे भक्तीभावाने दर्शन घेतले. दरम्यान पालखी सोहळ्याचे व्यवस्थापकांनी मंत्री महोदयाचे श्रींचा प्रसाद देऊन सत्कार केला
आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूराकडे मार्गस्थ होत आहे.
मुक्ताईनगर ते पंढरपूर पालखी सोहळ्याला ३१५ वर्षांची अखंड परंपरा आहे. ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे.
यावेळी प्रमुख पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते.
Social Plugin