जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : मतदार संघाचे मा. कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला श्रीरामजी कुटे यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवार, पहाटे ४ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार आज दुपारी ४ वाजता, जळगाव जामोद येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. राजेश, संजय, विनोद आणि प्रमोद कुटे या चारही भावंडांना समाजसेवेची प्रेरणा आपली आई उर्मिला ताईंनीच दिली. त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारातूनच ही कुटुंबीय समाजकार्याच्या वाटेवर नेहमी अग्रभागी राहिले.
मतदारसंघातील जनतेसाठी त्या मायेची उब होत्या. त्यांच्या निधनाने एक सच्ची प्रेरणादायिनी व्यक्ती हरपली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. युवा क्रांती न्यूज, युवा क्रांती डिजिटल मीडिया यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
Social Plugin