Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

शेगाव तालुक्यात केस गळतीनंतर नखे गळतीचे नवीन संकट;10 रुग्ण आढळले


शेगाव (जि बुलढाणा) – शेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक केस गळतीच्या घटनांनंतर आता नखे गळतीचे नवीन प्रकरण समोर आले आहे. सध्या शेगाव तालुक्यातील 29 पेक्षा अधिक रुग्णांमध्ये नखे गळण्याची लक्षणे आढळून आली आहेत, ज्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. मात्र, अद्याप भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) कडून याबाबत कोणताही अधिकृत अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.शेगाव तालुक्यातील बोडगाव मध्येच हा प्रकार उघडकीस आला आहे,अशी माहीती शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी दिली.
मागील केस गळती प्रकरणी ICMR च्या पथकाने प्रभावित गावांमध्ये तपासण्या  केल्या होत्या. त्यांनी रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले असून, काही गावांतील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, अद्याप या तपासण्यांचे अंतिम निष्कर्ष समोर आलेले नाहीत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.आता नख गळती
या अनपेक्षित आरोग्य समस्यांमुळे शेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन या समस्येचे मूळ शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेगाव तालुक्यातील केस आणि नखे गळतीच्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ICMR च्या तपासण्यानतरच या समस्येचे मूळ कारण समोर येईल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे.असे आवाहन आरोग्य विभागा कडून डा.अनिल बनकर यांनी केले आहे.