Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

जळगाव जामोद येथे आयुर्वेद महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग आणखी प्रशस्त, ना. हसन मुश्रीप यांचे अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठक. आ. डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई (विजय यादव ): नागपूर नंतर विदर्भात दुसरे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव जामोद येथे सुरू होण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. आजचा दिवस जळगाव जामोदसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. 
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव जामोद उभारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली. 
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत, सामंजस्य करार, पदनिर्मिती, अधिकारी-कर्मचारी, जागेची उपलब्धता, यंत्रसामुग्री, बांधकाम अंदाज पत्रक अशा अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
हे फक्त एक महाविद्यालय नसून, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मातीसाठी उभं राहणारे एक स्वप्न आहे!
या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल आणि आपल्या भागातील आयुर्वेद शिक्षणाचा एक नवीन अध्याय सुरू होईल.
बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, राज्याचे वैद्यकीय सचिव, आयुक्त सार्वजनिक आरोग्य, आयुक्त वैद्यकीय शिक्षण ,संचालक वैद्यकीय शिक्षण, संचालक आयुष संचनालय मुंबई,  उपसचिव वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई व  इतर संबधीत विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.