शेगाव (प्रतिनिधी)- येथील स्थानिक माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयातील "टी अँड पी डिपार्टमेंट" ने दिलेल्या अहवालानुसार माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयातील 70 टक्के विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदरच जगभरातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असून यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये आधीच रुजू सुद्धा करण्यात आले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच अनुशासन आणि अभिनव उपक्रम या गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेले माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच लक्ष ठेवत आले आहे याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयाचे विद्यार्थी हे दरवर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी त चमकतात यासोबतच अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय हे सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑफर देत आहे. यामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असून माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या रोजगाराची हमी देणारे महाविद्यालय सुद्धा बनले आहे.
चालू शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाने आतापर्यंत 70 टक्के विद्यार्थ्यांचे यशस्वीरित्या प्लेसमेंट केले आहे यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगार मिळालेला आहे. याहीपेक्षा महत्त्वाची बाब ही आहे की मुलांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा सुरू होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यापासूनच नोकरीत रुजू होण्याची संधी मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयामध्ये 45 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी भेटी दिलेले आहेत. अनेक विद्यार्थी असे सुद्धा आहेत ज्यांना एकापेक्षा अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑफर दिले आहेत. ही बाब माऊली महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी संबंधित असलेले विशिष्ट तांत्रिक कौशल्याचे धडे दिल्या जातात. याचा एकत्रित परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना एकापेक्षा एक अशा सरस रोजगाराच्या संधी मिळतात.
प्लेसमेंट ऑफर सोबतच माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयातून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून इंटर्नशिप संधी देण्यात आल्या आहेत.
यावर्षी भेट दिलेल्या कंपन्यांमध्ये टीसीएस /कागनिजंट /टेक महिंद्रा/ भारत फोर्ज /सिमेंस/ इंडोवन्स/ पोलाद स्टील/ फॉक्स कंट्रोल/ क्वालिटी कियोस्क/ पावर इन्स्ट/फिनिक्स मकानो/कोणार्क ग्लोबल/आशिदा इलेक्ट्रॉनिक/मनस्वी टेक सोलूशन इत्यादी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
हे सत्र पूर्ण होणे अगोदर या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट पूर्ण होईल असे मत महाविद्यालयाचे टी अँड पी ऑफिसर श्री तुषार बढे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Social Plugin