जळगाव जामोद (प्रतिनिधी) : विविध विकास कामांबाबत क्षेत्रस्तरीय विभाग निहाय आढावा बैठक सांकृतिक भवन जळगाव जामोद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विविध विभागाच्या कामांचा विभाग निहाय आढावा घेत जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या, आपण जनतेचे सेवक आहोत हीच भावना प्रत्येक अधिकाऱ्याने ठेवून आपले कर्तव्य वेळेत पूर्ण केले तरच विकास कामांना अधिक गती मिळून सर्वच कामे वेळेत पूर्ण होतील असा विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
जलसंधारण, पाणीपुरवठा, महावितरण, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, नदीखोलीकरण, जलयुक्त शिवार योजना याबाबत आढावा घेत आवश्यक त्या सूचना प्रशासनाला केल्या.
शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पानंद रस्ते हे पूर्ण करण्याचा माझा मानस असून त्यासाठी शासनानेसुद्धा पुढाकार घेत एक महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना देखील यावेळी संबधित विभागाला केल्या आहेत.
Social Plugin