Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर!


शेगांव दि. ०४ मे २०२५ (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२५ तारीख वेळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.

'या' वेबसाईटवर पाहू शकणार विद्यार्थी निकाल 

http://hscresult.mkcl.org

http://hscresult.mkcl.org

mahahssboard.in

Results.targetpublications.org

Results.navneet.com

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.