जळगाव खा. (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची राज्यव्यापी बैठक जळगाव खान्देश येथे 4 मे रोजी संपन्न झाली.
महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री धनगर समाज महासंघाचे संस्थापक मार्गदर्शक मा. डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत असलेल्या धनगर समाज महासंघाच्यावतीने रविवार दि. 4 मे 2025 रोजी सकाळी 12 वाजता जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक निमखेडी रोड जळगाव येथे महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, सांस्कृतिक महासंघाचे प्रदेश पदाधिकारी, विविध आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी बैठक घेण्यात आली...
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट चिमणभाऊ डांगे हें होते.
या बैठकीस धनगर समाज महासंघाचे नेते माजी आमदार ऍडव्होकेट रामहरी रूपनवर (नातेपुते, सोलापूर), माजी प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे (शेगाव), महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे (इस्लामपूर सांगली), प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ (धुळे), मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे (कोल्हापूर), सुभाष सोनवणे मा. महामंत्री धनगर समाज महासंघ (जळगाव), अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलकाताई गोडे (अकोला), कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अंकुशराव निर्मळ (बीड), प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे (जळगाव), अरविंद देशमुख (संचालक दूध फेडरेशन, जळगाव), पांडुरंग काकडे, शरदभाऊ वसतकर (अमरावती), सौ. रेखाताई न्हाळदे (जळगाव) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Social Plugin