शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दिनांक ०७ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) बुलढाणा यांच्या पथकाने शेगाव शहरात कारवाई करत नामवंत सिव्हिल इंजिनियर प्रशांत बानोले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
फिर्यादी दिनकरराव नारायणराव रायपुरे (रा. चंद्रलोक सोसायटी, मुरारका कॉलेज रोड, शेगाव) यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा कडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतीच्या जमिनीचे व्यावसायिक अकृषक (NA) रूपांतरण नगर रचना विभाग, बुलढाणा कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी आरोपी प्रशांत महादेव बानोले यांनी ७५००० रुपयांची लाच मागितली होती.
एसीबी बुलढाणा पथकाने सापळा रचून अप.न. २५७/२०२५ कलम सात ए लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली आहे.
Social Plugin