मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : आईच्या प्रियकराने अडीच वर्षांच्या चिमुरडीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार करत हत्या केली. सदर घटना मालवणी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. पोलिसांनी आईसह प्रियकराला अटक केली असून वेदनेने तडफडणाऱ्या चिमुकलीचे आईनेच पांय पकडले. एवढ्यावरच न थांबता चिमुरडींचा आक्रोश थांबविण्यासाठी तोंड उशीने दाबले. त्यानंतर मुलीने प्राण सोडले. मन हेलावणाऱ्या या घटनेने मालवणी परिसर हादरला आहे.
मालवणी पोलिसांनी ३० वर्षीय आईसह तिच्या १९ वर्षीय प्रियकराला बलात्कार आणि हत्याप्रकरणी अटक केली. चिमुरडीच्या यकृतासह अन्य अवयवांना झालेल्या गंभीर जखमा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. विकृत आईला पतीने सोडल्यानंतर ती घरकाम करून उदनिर्वाह करत होती, तिची १९ वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. घरी येणे जाणे वाढले. रविवारी प्रियकर घरी आला.चौकशीत प्रियकराची वासना भागवण्यासाठी आईने चिमुरडीला पुढे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पोलिस कसून चौकशी करत आहेत.
प्रियकराने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारादरम्यान जन्मदात्या आईनेच चिमुरडीचे पाय धरले. तिची किंकाळी कुणाला ऐकू येऊ नये म्हणून तिचे दोघांनी मिळून मुलीचे तोंड दाबले.क्रुर अत्याचाराने सीमा गाठल्याने मुलीने प्राण सोडले.
मुलगी निपचित पडल्याने तिला घेऊन महिलेने जवळचे सरकारी रुग्णालय गाठले. मुलीला फीट आल्याने ती पडल्याचे महिलेने सांगितले. मात्र,मुलीची अवस्था बघून डॉक्टरांना संशय आला.
शरीरावरील चावल्याच्या गंभीर जखमा बघून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मुलीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच, अत्याचाराला वाचा फुटली.
Social Plugin