जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद नगर परिषदेच्या कार्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या निमित्ताने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकीत आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वतः लक्ष घालून विकास कामांना गती देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा – दिले स्पष्ट निर्देश..!
या बैठकीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कर्मचारी, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, स्वच्छता मोहिम, तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा झाली. निर्माणाधीन विकासकामांबाबत विभाग प्रमुखांकडून तपशीलवार माहिती घेण्यात आली. काही कामांमध्ये होत असलेल्या विलंबाचे कारण समजून घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणसोबत समन्वय..!
शहरातील काही भागांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत, आमदार डॉ. संजय कुटे यांनी महावितरणसोबत समन्वय साधून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यावर भर देण्यात आला.
स्वच्छतेसाठी विशेष मोहिम – बाजारपेठ, चौकांमध्ये विशेष लक्ष..!
शहरात स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, मुख्य चौक याठिकाणी नियमित साफसफाई होण्यासाठी प्रशासनाला कठोर सूचना देण्यात आल्या. वाहतुकीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.
"विकास कामांमध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही!" – डॉ. संजय कुटे
या बैठकीत बोलताना आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध असून, प्रशासनाने गतीने कामे पूर्ण करावीत. विकास कामांमध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही."
या बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाला पुढील वाटचालीसाठी स्पष्ट दिशा मिळाली असून, आगामी काळात शहरातील विविध विकास कामांना नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Social Plugin