जळगाव जामोद जि. बुलढाणा : बुलढाणा जिल्हा वार्षिक योजना 2025 अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर मौजे उमापूर येथे आमदार डॉक्टर संजय कुठे यांचे उपस्थितीत उत्साहात पार पडले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने महसूल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर नुकतेच मौजे उमापूर येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्दिष्ट नागरिकांच्या विविध महसूलविषयक तक्रारी, अडचणी आणि प्रश्न समजून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करणे हे होते.
या शिबिरात उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,तहसीलदार पवन पाटील,गटविकास अधिकारी संदीप मोरे तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सूचना सांगितले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानकारक प्रतिसाद दिसून आला. शासकीय सेवा थेट गावपातळीवर मिळाल्याने नागरिकांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
महसूल विभागाच्या वतीने यापुढेही अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करून सामान्य जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले
Social Plugin