Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचा निकालात शंभर टक्के यशाचा टक्का..!

विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी


एकलारा बानोदा, ता. संग्रामपूर (आकाश बोरसे):
नुकत्याच जाहीर झालेल्या व्होकेशनल ट्रेनिंग परीक्षेच्या निकालात संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरने दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून विद्यार्थ्यांनी दाखवलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. अक्षय शिवकुमार गिरी याने ८९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे राम गजानन गायकवाड याने ८८.७४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर आकाश प्रकाश इंगळे याने ८७.७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या तिघांची घवघवीत कामगिरी केंद्राच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय संस्थेचे कुशल आणि मार्गदर्शक प्राचार्य शिवकुमार भातखडे यांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.


संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव राजारामजी भातखडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिक्षकवर्गाचे देखील कौतुक करून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे.
या संस्थेचा सलग शंभर टक्के निकाल व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण यामुळे श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे या क्षेत्रात एक आदर्श ठरले असून, व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा