Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

कारगिल विजय दिनानिमित्त रोटरी क्लब शेगांवतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसा


शेगांव
(युवा क्रांती वृत्तसेवा) : देशभक्तीची भावना जोपासत, शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ कारगिल विजय दिवस निमित्त रोटरी क्लब शेगावच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर आज २६ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीबी मुरारका महाविद्यालय, शेगाव येथे पार पडले.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपले अमूल्य रक्तदान करून देशसेवेला एक प्रकारे मानवंदना अर्पण केली. कारगिलच्या रणभूमीवर देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत, या दिवशी रक्तदान करून देशसेवा हा सर्वोच्च धर्म असल्याचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला गेला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन करताना रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने शिबिर पार पाडले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, रक्तदानासारख्या जीवनदायिनी कार्याला कारगिल विजय दिनासारख्या प्रेरणादायी दिवशी जोडल्यामुळे शिबिराचे महत्व अधिकच वाढले आहे.