चिखली, जि. बुलढाणा (प्रतिनिधी) : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चिखली येथे एक भव्य व सन्मानपूर्वक सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले सत्कारमूर्ती विद्याधरजी महाले साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव, यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या समस्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाय करण्याचे ठाम आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हयून पठाण, राज्याध्यक्ष, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांनी उपस्थित राहून अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत, संघटनेच्या एकजुटीचे व सेवा-भावनेचे महत्त्व अधोरेखित केले.मुख्य अतिथी म्हणून मनीष राजगुरे, अमरावती विभागीय उपाध्यक्ष, यांनी उपस्थित राहून संघटनेच्या कार्याला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल जय शिरसाठ, तालुका अध्यक्ष, चिखली यांनी विशेष सत्कार केला.
इतर मान्यवर स्वागतप्रसंगी सत्कारमूर्तीं विद्याधरजी महाले साहेब, खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत संघटनेचे राज्याध्यक्ष हयून पठाण यांनी केले. राज्याध्यक्ष ह्यून पठाण यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ठेंग (बुलढाणा) यांनी केले नायब तहसीलदार हरी वीर यांचे स्वागत श्री मनीष राजगुरे यांनी केले. या कार्यक्रमात संघटनेची कार्यक्षमता वाढावी यासाठी विनोद वायझोडे यांची जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे कुशल संचालन केशव सोनुने, जिल्हा सचिव यांनी केले, तर रमेश जोहरे, जिल्हा कोषाध्यक्ष यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर: राहुल गवई (जिल्हा सचिव, बुलढाणा), रमेश जोहरे (जिल्हा कोषाध्यक्ष, बुलढाणा), जय शिरसाठ (तालुका अध्यक्ष, चिखली), जयंत वराडे (तालुका अध्यक्ष, शेगाव, सांडु भगत ( तालुका अध्यक्ष बुलढाणा), रामेश्वर सोळंकी (जय सियाराम) (जिल्हाध्यक्ष, त्रिदल सैनिक सेवा संघ, बुलढाणा), कृष्ण बंगाळे (जिल्हाध्यक्ष, सैनिक फेडरेशन, बुलढाणा) , विनायक सरनाईक, माजी सदस्य पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला. या कार्यक्रमास संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला. (युवा क्रांती वृत्तसेवा)
Social Plugin