Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

भाजपा पक्षाचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन देशमुख यांची फेरनियुक्ती तर; घाटावरील जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार विजयराज शिंदे


बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) :
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजयराज शिंदे यांची पक्षाच्या बुलढाणा ( घाटावरील ) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा पक्षाच्यावतीने आज दुपारी करण्यात आली. याशिवाय पक्षाचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाणा मतदारसंघाचे विधानसभेत तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले विजयराज शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पक्षात शिंदे यांची विशेष ओळख आहे. भाजपात आल्यापासून त्यांनी पक्षाच्या संघटन कार्यात स्वतःला झोकून दिल्याचे मागील काळात पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पक्षाकडून विजयराज शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी बरेच गाजले होते हे विशेष. माजी आमदार शिंदे यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आल्यानंतर आता नव्याने खेळ मांडणी संघटनेची निर्माण होऊन पक्षाला नवी बळकटी मिळेल अशी अपेक्षा भाजपाचे जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

तर, भाजपा पक्षाचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. सचिन देशमुख यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आल्यानंतर अनेक कार्यकर्ते संघटनेशी जुळले आणि आता त्यांच्या फेरनियुक्तीने जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.