Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

सोमवारी भव्य तिरंगा रॅली, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मंत्री आकाश फुंडकरांचे आवाहन


खामगाव 
(युवा क्रांती वृत्तसेवा) : देशाच्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खामगाव शहरात सोमवारी भव्य तिरंगा मोटर सायकल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात करण्यात आले आहे.आजचा नवीन भारत झुकणार नाही, आणि थांबणार नाही हे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने व सरकारने जगाला सिद्ध करून दाखवले.पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या सेनेने ऑपरेशन सिंदूर द्वारे दिलेलं चोख  प्रत्युत्तर हे अतिशय अभिमानास्पद आहे.

वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ,भारतमातेस व शहीद झालेल्या जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप  भारतीयांना अभिवादन करण्यासाठी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन आले आहे. सोमवार दिनांक 19 मे रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून भव्य तिरंगा रॅली ला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा रॅलीचे नेतृत्व राज्याचे कामगार तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲड.आकाश फुंडकर करणार आहेत. 

तसेच भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांच्या यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना व पूजन केल्यानंतर या भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे. भुसावल चौक ,सरकी लाईन ,अर्जुन जल मंदिर ,महावीर चौक ,त्रिशूल चौक ,फरशी चौक ,शहीद भगतसिंग पुतळा ,एकबोटे चौक, सकळकळे कॉम्प्लेक्स ,सप्तशृंगी माता मंदिर,, केला पोस्ट ऑफिस सिविल लाईन ,जलंब नाका, खामगाव जिल्हा न्यायालय, केला हिंदी शाळा मार्गे मार्ग क्रमांकृत मार्गक्रमण करीत टावर चौक येथील जयस्तंभ येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जय स्तंभाला मानवंदना करून या रॅलीचा समारोप होणार आहे. 

 जात, पात, धर्म, पंथ,पक्ष भेद विसरून सर्व क्षेत्रातील नागरिकांनी  या भव्य तिरंगा रॅली मध्ये सहभागी होऊन आपली जाज्वल्य राष्ट्रभक्ती प्रगट करावी असे आवाहन ना.अँड.आकाश फुंडकर यांनी केले आहे.