शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : तालुक्यातील आडसूळ या ग्रामीण भागात वनराईच्या छायेखाली वसलेल्या स्वर्गीय नारायणरावजी वानखडे विद्यालयामध्ये कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय वानखडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेगाव ग्रामीणचे ठानेदार प्रवीण लिंगाडे होते.
प्रास्ताविकेमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लमक सरांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच शेतीला पूरक असा व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करावा असा विचार व्यक्त केला. मार्गदर्शक म्हणून लिंगाडेनी वेगवेगळ्या विषयाला हात घालून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
26 जून जागतिक व्यसनमुक्ती दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून आपल शैक्षणिक करिअर घडून समाजापुढे एक आदर्श नागरिक बनवून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करण्याची जबाबदारी स्वीकारावी असं मत मांडले. विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याच्या संदर्भातील फायदे व तोटे याविषयी जागृत केले. तसेच विद्यालयातून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. कृषी दिनाच औचित्य साधून विद्यालयामध्ये वृक्ष लागवड करून निसर्गाचे जतन व संरक्षण करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोमासे व आभार प्रदर्शन सुहास हिवराळे यांनी केले. यावेळी नाईक पोलीस कॉन्स्टेबल गजानन ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवराज आराख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सन्माननीय शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. सरते शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Social Plugin